बरेच वर्षं, प्रेमाची आतुरता लागली नाही,
पहिले तिला आणि तिला पाहण्याची आतुरता बरेच वर्षं गेली नाही.
तिला पाहता क्षणि पडलो तिच्या प्रेमात,
नि भान हरपून बसलो मी बघता तिच्या निळ्याशार डोळ्यात.
एका गावात राहून सुद्धा नाव गाव ठाऊक नव्हतं,
दुसऱ्या कुठल्याही कामात लक्ष काही लागत नव्हतं.
स्वप्नं रंगवत राहिलो, एका सुंदर भविष्याची,
आणि वाट पाहत राहिलो त्या पहिल्या गोड भेटिची.
नाव काही कळेना,भेट काही होईना,
काय करावे कळेना, माझं मलाच करमेना.
गाण्यांच्या वर्णनांत मी शोधू लागलो तिला,
ती माझी आणि मी तिचा, हे कसं सांगू तिला?
एक दिवस नाव कळलं, गाव तिचं शोधून काढलं,
तिच्याशी मैत्री कारायचं हे मी निक्षून ठरवलं.
बोलणं सोप्पं आणि करणं कठीण,
हे नंतर मला नीट समझलं,
अजून थोडा धीर जमवून, तिच्याशी बोलायचं ठरवलं.
बोलणं झालं …मैत्रि थोडी दूर होती,
मला पुढे जायची…जरा घाई होती.
मनोगत व्यक्त करणं हे अजिबात सोप्पं नाही.
कितीहि धीट बना, तिच्या समोर एक शब्द फुटत नाही.
आज तो काळ गेला, वेळ गेली,
आठवण काही जात नाही.
आपण फक्त मित्र राहू,
या वाक्याला जगात काही तोड नाही.
कोण कधी सांगू शकलय,
प्रवास प्रेमाचा कसा करावा?
कधी कोणावर प्रेम बसेल,
याचा काय कोणी भरोसा द्यावा?
कळत नकळत हा प्रवास चालू होतो,
त्या नंतर असं ऐकलय, कारावास चालू होतो !

No comments:
Post a Comment